"घरीच बनवा मुलांसाठी मान ...
Only For Pro
Reviewed by expert panel
पावसाळ्यात रिमझिम पडणारा पाऊस त्यासोबत गरमागरम चहा सोबत कुरकुरीत तळलेले भजी खाण्याची इच्छा येतेच अगदी लहानगे सुद्धा तेच डिमांड करत असतात. तुम्हाला आणि मुलाला काहीतरी मसालेदार आणि काही वेळा तळलेले खावेसे वाटते. पण हे असे पदार्थ आहेत जे तुमच्या लहानग्यास हानिकारक असु शकतात खरं ना!! तर मग, निरोगी राहण्यासाठी मुलांनी काय खावे आणि काय खाऊ नये किंवा तुमच्या मुलाला काय खायला द्यावे याबद्दल या ब्लॉग मध्ये पावसाळ्यातील सर्वांची आवडती सुंदर रेसिपी मिसळ-पाव आणि कोथींबीर वडी आपण पाहूया ज्यामुळे आरोग्यदायी फायदे होतील. चला तर मग जाणून घेऊया!!
मिसळ-पावबद्दल माहिती
मराठी भाषेत मिसळ या शब्दाचा अर्थ मिश्रण असा होतो. या अंकुरलेल्या रश्याला उसळ असेही म्हणतात.बर्याच वेळा मी मुलासाठी फक्त उसळ (स्प्राउट्स) भाजी बनवते आणि ती चपाती किंवा पोळी व वाफवलेल्या भाताबरोबर देते आणि मुलेही आवडीने खातात बरं का!!
पौष्टिक आरोग्यदायी मिसळ-पाव कसा बनवायचा!
उसळ म्हणजे यात सर्व प्रकारचे धान्य भिजत घालून अंकुरित केलेले असावे ज्यामुळे लहानग्याला त्याचे सर्व आरोग्यदायी फायदे मिळतील (स्प्राउट्स) सर्व प्रथम उसळ शिजवणे
मसाले
¼ टीस्पून हळद पावडर
1 टीस्पून धने पावडर
1 टीस्पून जिरे पावडर
½ टीस्पून लाल तिखट किंवा लाल मिरची,गोडा मसाला
ढवळा आणि आवश्यक असल्यास ¾ ते १ कप पाणी किंवा अधिक पाणी घाला. साधारणपणे मिसळ करी मध्यम किंवा पातळ असते. त्यामुळे तुमच्या पसंतीनुसार पाणी समायोजित करा, परंतु ते खूप पातळ करू नका कारण यामुळे चव पातळ होईल,आवश्यकतेनुसार मीठ घाला.
कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. बाजूला ठेवा. टोमॅटो ऐच्छिक आहेत आणि तुम्हाला हवे असल्यास वगळले जाऊ शकतात.चिरलेला कांदा आणि टोमॅटो वेगळ्या भांड्यात.नंतर आवडीनुसार वर फरसाण किंवा चिवडा घाला. चिरलेला कांदा आणि फरसाण/शेव/चिवडा मिक्स करून सर्व्ह करा. आता सध्या तरी बाजरपेठेत मुबलक प्रमाणात
कोथिंबीर वड्या
कोथिंबीर जुडी उपलब्ध आहेत आणि ही आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे.
कृती
पावसाळ्यात काय खावे आणि काय टाळावे?
मुलांनी पावसाळ्यात टाळावे असे अन्न!! पावसाळ्यात कोणते पदार्थ टाळले जातात आणि पावसाळ्यात तुम्ही कोणते पदार्थ खाऊ शकता याची यादी येथे आहे...
Be the first to support
Be the first to share
Comment (0)